राजीव गोपाळ देशमुख - लेख सूची

शेतकऱ्याच्या दुरवस्थेची वास्तविकता

गेल्या २५-३० वर्षांतील शेतीचा अनुभव आजच्या शेवटच्या टप्प्यात मात्र कटु वाटू लागला. सन १९७२ च्या दुष्काळापासून शेतीउत्पादनातील चढउतार पाहावे लागले. शेती निसर्गावर अवलंबून की नशिबावर हेच आज कळेनासे झाले आहे. माझे वडील ‘अण्णा’ यांनी कराड तालुक्यातील शेतांत १९५२ नंतर दोन विहिरी पाडल्या. जमिनीस बांध घातले. शेतीतील अनपेक्षिततेचे ओझे सहन केले. बँका- सोसायट्यांच्या कर्ज-थकबाकीबद्दल अनेक वेळा …